आश्रमजीवनाची ओढ असणारी, धर्माभिमानी आणि निर्भिड असणारी पळ्ळुरुत्थी, केरळ येथील बालसाधिका कु. देवीनंदना हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवीनंदना ही एक आहे !

कु. देवीनंदना हिचा सत्कार करतांना श्रीमती सौदामिनी कैमल

कोची (केरळ) – कोची येथील बालसाधिका कुमारी देवीनंदना (वय १२ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्याचे १४ मार्च या दिवशी येथील सेवाकेंद्रात झालेल्या भावसत्संगात घोषित करण्यात आले. या वेळी तिची आई श्रीमती रजिता बिनीश आणि आजोबा श्री. के.वी. सतीशन् यांच्यासह सनातनचे साधक उपस्थित होते. श्रीमती रजिता या गेल्या दीड वर्षापासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.

असा झाला भावसत्संग !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संशोधन सेवेसाठी गोव्याहून केरळ येथे आलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी या सत्संगात ‘सनातन आश्रमात झालेली पादुका प्रतिष्ठापना आणि सहस्रदीपदर्शन सोहळा यांत आलेल्या अनुभूतींविषयी उपस्थितांना विचारले. त्या वेळी बालसाधिका कु. देवीनंदना हिने तिला आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्यानंतर कु. प्रियांका लोटलीकर यांनी ‘कु. देवीनंदना हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कळवले आहे’, हे घोषित केले. या वेळी उपस्थितांचा भाव जागृत झाला.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या कोची येथील साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांनी कु. देवीनंदना हिचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्या वेळी कृतज्ञता व्यक्त करतांना कु. देवीनंदना म्हणाली, ‘‘परमपूज्य गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझी प्रगती झाली आहे.’’

या वेळी साधकांनी कु. देवीनंदना हिच्याकडून विविध प्रसंगात शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. तिचा सत्संग घेणार्‍या साधिका सौ. शालिनी सुरेश यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना कु. देवीनंदना म्हणाली, ‘‘मला गुरु कसे आहेत’, हे ठाऊक नाही. माझ्यासाठी शालिनी या गुरुरूपच आहेत.’’


Multi Language |Offline reading | PDF