पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सुटका झाली नाही, तर देशभरात ठिकठिकाणी सत्याग्रह करू !

मुंबई येथील पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या समर्थनार्थ काढलेल्या पदयात्रेत हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करण्यामागे मोठ्या राजकीय नेत्यांचे षड्यंत्र आहे. व्यक्तीगत स्वार्थ आणि द्वेष यांमुळे ते पूज्यपाद बापूजी यांना बाहेर येऊ देत नाहीत. पूज्यपाद बापूजी यांनी अनेकांना साधनेला लावले आहे. कित्येकांना व्यसनमुक्त केले आहे. देश आणि समाज यांसाठी स्वत:चे आयुष्य वेचले आहे. त्यांनी गायींना कसायापासून वाचवून गोशाळांची निर्मिती केली आहे. जर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सुटका झाली नाही, तर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी सत्याग्रह करू, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठांनी दिली. १० मार्च या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या समर्थनार्थ त्यांचे भक्त आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या मौन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी ही चेतावणी दिली. शिवाजी पार्क, दादर येथून प्रारंभ झालेल्या या यात्रेची सांगता वरळी, आदर्शनगर येथील स्पोर्ट्स मैदानात झाली. या ठिकाणी पदयात्रेचे छोट्या सभेत रूपांतर झाले. पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी ‘ॐ’ चिन्हांकित भगवे ध्वज आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू हे निर्दोष असल्याच्या लिखाणाचे हस्तफलक हातात घेतले होते. अतिशय शिस्तबद्धरितीने काढण्यात आलेली ही पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या पदयात्रेत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त श्री. राजेंद्र घोणे आणि श्री. एस्.एस्. गौतम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विनय मिश्रा यांनी केले. सभेनंतर श्री आसारामायणपाठ आणि आरती म्हणण्यात आली.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आणि हिंदुत्वनिष्ठयांची निर्दोष मुक्तता होऊन सत्याचा विजय होईल ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक वैद्य उदय धुरी

कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह असोत, हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई असोत, नालासोपारा कथित स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते असोत किंवा लक्षावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू असोत, या सर्वांवरील अन्याय अजूनही संपलेला नाही. या सर्वांची निश्‍चितच निर्दोष मुक्तता होईल आणि या विजयाची सभा लवकरच होईल.

धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी भगवंत स्वत: अवतार घेतो ! – ह.भ.प. ईश्‍वरजी महाराज नागरे

‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’, असे वचन आहे. प.पू. आसारामजी बापू यांनी दैवी गुणांच्या आधारावर साधकांना सर्वश्रेष्ठ बनवले आहे. त्यांचा आशीर्वाद सर्वांना आहे. जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि मनुष्याची भक्ती श्रेष्ठ होते, तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो. अशा वेळी धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी भगवंत आधी संतांना पाठवतो, त्यानंतर स्वतः येतो. षड्यंत्र हेसुद्धा एक साधन असून भगवंताने प.पू. बापूंना ग्लानी दूर करण्यासाठी पाठवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF