(म्हणे) ‘मुलाने भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी माझी भूमिका नव्हती !’ – राधाकृष्ण विखे पाटील

राजकीय स्वार्थासाठी सोयीची भूमिका घेणार्‍यांना जनता ओळखून आहे !

मुंबई – नगरच्या जागेवरून हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला, हे मुळात चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग ३ वेळा पराभव झाला आहे. ही जागा काँग्रेसला मिळाली, तर आघाडीची एक जागा वाढेल, अशी माझी भूमिका होती. मुलाने भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी माझी भूमिका नव्हती, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी १४ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मुलगा डॉ. सुयश यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यावर राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.


Multi Language |Offline reading | PDF