मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून ट्वीटद्वारे विज्ञापनाचा विरोध करणार्‍यांना मारहाण करण्याची चिथावणी

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ‘सर्फ एक्सेल’ उत्पादनाच्या आक्षेपार्ह विज्ञापनाचे प्रकरण

  • अशी चिथावणी देणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात हिंदूंनी तक्रार करून त्यांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • भाजप सरकारकडून मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात स्वतःहून काही कृती करण्याची अपेक्षा नसल्याने हिंदूंनीच कृतीशील होण्याची आवश्यकता आहे !
  • हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदूंना मारहाण करण्याची चिथावणी देणार्‍या मेहबूबा मुफ्ती सैन्यावर दगड फेकणार्‍यांना मात्र गोंजारतात, हे लक्षात घ्या !

मुंबई – हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी आस्थापनाच्या ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाच्या होळी या सणावर आधारित विज्ञापनातून हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांचा अवमान करण्यात आला आहे. याचा धर्माभिमान्यांकडून विरोध करण्यात येत आहे. हिंदूंच्या विरोधावरून काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी अशा हिंदूंना मारहाण करण्याचे ट्वीट केले आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे एक चांगला सल्ला आहे. अशा भक्तांची ‘सर्फ एक्सेल’द्वारे चांगलीच धुलाई केली पाहिजे; कारण सर्फची धुलाई डाग स्वच्छ करते.’ त्यांच्या या ट्वीटला धर्माभिमान्यांकडून ट्वीटद्वारेच विरोध केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF