नवी मुंबई शहरनिर्मितीसाठी विस्तारित गावठाणांच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध

नवी मुंबई – ४० वर्षांपासून रखडलेल्या विस्तारित गावठाणांच्या सर्वेक्षणात शासन मनमानीपणा करत असल्याचा आरोप करत या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

राज्यशासनाने नवी मुंबई शहरनिर्मितीसाठी५९ सहस्र प्रकल्पग्रस्तांच्या भूमी संपादित केल्या आहेत. या भूमी संपादित करतांना प्रकल्पग्रस्तांच्या गावांचे सर्वेक्षण करण्याचे आश्‍वासन सिडकोने दिले होते; पण ते पूर्ण करण्यात आले नाही. भूसंपादनाच्या विरोधामुळे केवळ सात गावांचे सर्वेक्षण त्या वेळी करण्यात आले होते.१२ मार्चपासून एका आस्थापनाच्या वतीने हे सर्वेक्षण बेलापूरमधून चालू करण्यात आले होते. याला बेलापूर ग्रामस्थांनी विरोध केला होता. आमदार संदीप नाईक यांनी ‘सर्वेक्षण प्रकल्पग्रस्तांची घरे मालकी हक्कांसाठीच आणि मालमत्ता पत्रक देण्यासाठीच होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करावे अन्यथा याला तीव्र विरोध करू’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, त्यांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे नियमित व्हावीत तसेच त्यांना सर्व सुखसुविधा मिळाव्यात, यासाठीच हे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे भूलथापांना कोणी बळी पडू नये. सर्वेक्षणानंतर नियमानुसार मालमत्तापत्रक दिले जाईल’, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now