पोलंडमध्ये गेल्या ३ दशकांत ४०० हून अधिक पाद्रयांकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण

  • भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्या जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदु संतांवरील खोट्या आरोपांना कुप्रसिद्धी देतात !
  • लोकांनी आता चर्चला ‘वासनांध पाद्य्रांचे स्थान’ आणि पाद्रयांना ‘वासनांध व्यक्ती’ असे म्हणायला प्रारंभ केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

वॉर्सा (पोलंड) – येथे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पोलंडमधील एका मोठ्या कॅथलिक चर्चने, ‘गेल्या ३ दशकांत चर्चच्या ४०० हून अधिक पाद्रयांनी लहान मुलांचे आणि मुलींचे लैंगिक शोषण केले’, हे स्वीकारले आहे. एका मासापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एका बिशपने सांगितले की, ३८२ पाद्रयांनी ६२४ मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. यात १९८ लहान मुलांचा समावेश आहे. त्यांचे वय १५ वर्षांहून अल्प आहे. तसेच १८४ मुले १५ ते १८ वर्षे वयोगटांतील आहेत; मात्र अहवालात या पाद्रयांची नावे देण्यात आलेली नाहीत. ही संस्था अशा पीडित मुलांचा सांभाळ करत आहे.

१. वॉर्सा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बालकल्याण विभागाशी निगडित अधिकारी अ‍ॅडम जॅक यांनी सांगितले की, अशी प्रकरणे पुढे येणे, हा एक प्रारंभ आहे.

२. आर्चबिशप मारेक जड्राजेवेस्की यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत दोषींच्या विरोधात कारवाई करण्यास चर्च कटीबद्ध आहे; (मुळात ३ दशके असे प्रकार चालू होते आणि त्याविषयी चर्चला ठाऊक नव्हते, असे कसे ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! – संपादक)

मात्र जर दोषींनी त्यांचा अपराध मान्य केला आणि स्वतःमध्ये पालट करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्यावर सौम्य कारवाई केली जाईल. (असे सर्वच जण म्हणतील आणि थोडीशी कारवाई झाल्यानंतर स्वतःची सुटका करून घेतील ! त्यामुळे पुढे अन्य पाद्रीही लैंगिक शोषण करून ते स्वीकारतील आणि अल्प शिक्षा भोगून पुन्हा लैंगिक शोषण करण्यास मोकळे होतील ! – संपादक) लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारे केवळ चर्चमध्येच नाही, तर परिवारांमध्येही मोठ्या संख्येने आहेत. (असे म्हणून आर्चबिशप वासनांध पाद्रयांना पाठीशीच घालत आहेत. परिवारांमध्ये काय घडते यापेक्षा चर्चमध्ये असे प्रकार का घडत आहेत, हे आर्चबिशप यांनी पहायला हवे आणि त्यावर उपाययोजना काढायला हवी ! – संपादक)

३. या संदर्भात ‘बी नॉट अफ्रेड फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी पोप फ्रान्सिस यांना २७ पानांचा एक अहवाल पाठवून मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (जगभरात विविध चर्चमध्ये पाद्रयांनी मुलांचे लैंगिक शोषण केल्याची अनेक प्रकरणे पुढे आली; मात्र पोप फ्रान्सिस यांनी नेहमीच अशा पाद्रयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणातही पोप काही कृती करतील, अशी अपेक्षाच नको ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF