आचारसंहितेचे कारण पुढे करत जळगाव जिल्ह्यातील काही गावांतून भगवे ध्वज काढले !

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झाकण्याचे धानोरा ग्रामपंचायतीचे आदेश !

आचारसंहितेचे कारण पुढे करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झाकण्याचा आदेश देणे आणि भगवे ध्वज काढणे हे देशाचा पाकिस्तान झाल्याचे द्योतक नाही का ?

जळगाव, १५ मार्च (वार्ता.) – निवडणूक आचारसंहितेचे कारण देत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, चांदसनी-कमळगाव आणि धानोरा येथे हिंदूंच्या घरावर लावलेले ध्वज प्रशासनाने काढले. चांदसनी-कमळगाव येथे ग्रामसेवक आणि शिपाई यांनी हिंदूंच्या घरावरचे भगवे ध्वज काढले आणि कह्यात घेतले. काही जणांनी याला विरोध केला, तेव्हा त्यांना ‘तुमच्यावर आचारसंहिता भंग केल्याची केस (खटला) घालू’, असा धाक दाखवण्यात आला. ज्यांनी काढण्यास नकार दिला त्यांची नावे लिहून घेतली आणि ‘केस (खटला) घालतो’, अशी धमकी दिली. महिलांनीसुद्धा विरोध केला; मात्र त्यांचेही ऐकून घेतले नाही. धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झाकून ठेवण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना आदेश दिले.

आचारसंहितेचा नियम केवळ पक्षचिन्ह असलेल्या झेंड्याविषयी; सरसकट सगळ्या भगव्या ध्वजाशी नाही ! – चोपडा येथील गट विकास अधिकारी श्री. भारत कोसुदे

चोपडा येथील गट विकास अधिकारी श्री. भारत कोसुदे यांची हिंदु जनजागृती समितीचे चोपडा येथील समन्वयक श्री. यशवंत चौधरी यांनी भेट घेऊन सदर घटनेविषयी माहिती दिली. त्यावर कोसुदे यांनी ‘असा काही नियम नाही’, असे सांगितले. नियम केवळ पक्षचिन्ह असलेल्या ध्वजाविषयी आहे, कोणत्याही धर्माच्या ध्वजाविषयी नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यानी संबंधित ग्रामसेवकाची कानउघाडणी केली. ‘या संदर्भात सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना याविषयी कल्पना देतो’ असेही श्री. कोसुदे यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF