मसूद अझहरला जागतिक आतंकवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने पुन्हा नकाराधिकार वापरून फेटाळला

  • केवळ व्यावहारिक कारणांमुळेच चीन सातत्याने मसूद अझहर याला वाचवत आहे; मात्र एक दिवस हेच जिहादी आतंकवादी चीनला डसल्याविना रहाणार नाहीत, हे त्याने लक्षात ठेवावे !
  • चीनला जिहाद्यांची मानसिकता माहिती असल्यानेच त्याने त्याच्या शिनझियांग या मुसलमानबहुल प्रांतातील १० लाख मुसलमानांना छळ छावण्यांमध्ये ठेवलेले आहे. आता भारतानेही या मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनवर दबाव निर्माण करावा !

संयुक्त राष्ट्र – मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी ठरवण्याच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्ताव चीनने नकाराधिकाराचा वापर करून फेटाळून लावला. पुलवामा येथील आक्रमणाचे दायित्व जैशने घेतल्यावर फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी भारताची बाजू घेऊन २७ फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव मांडला होता.

चीनकडून ४ वेळा नकाराधिकाराचा वापर

चीनने या प्रस्तावावर आतापर्यंत ४ वेळा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीन हा सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने त्याला याचा वापर करता येतो.

चीनवर कारवाई करण्याची अमेरिकेची चेतावणी

मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी ठरण्याचा प्रस्ताव चीनने नकाराधिकाराचा वापर करून फेटाळल्यावर अमेरिकेने एक परिपत्रक काढत चीनच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. यात अमेरिकेने म्हटले आहे की, ‘पाकिस्तान चीनच्या साहाय्याने मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी घोषित करण्यापासून वाचवत आला आहे. चीनने सलग चौथ्यांदा मसूद अझहरला जागतिक आतंकवादी होण्यापासून वाचवले आहे. चीनने जर मसूद अझहरला पाठीशी घातले, तर सुरक्षा परिषदेच्या अन्य सदस्य देशांना याविरोधात कठोर पाऊल उचलावे लागेल. आशा आहे परिस्थिती नियंत्रणात राहील.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now