दुसर्‍या देशावर आतंकवादी आक्रमण करणारे आतंकवादी पाकमध्ये मोकाट कसे ? – बिलावल भुट्टो

इस्लामाबाद – पाकमधील सक्रीय आतंकवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जात नाही. माझ्या आईचीही हत्या याच कारणामुळे झाली. परदेशांमध्ये आतंकवादी कारवाया करत आहेत. दुसर्‍या देशांमध्ये आतंकवादी कारवाया करणारे आतंकवादी पाकमध्ये मोकाट कसे फिरत आहेत ? आज संपूर्ण पाकला आतंकवादाची किंमत मोजावी लागत आहे, असा घरचा अहेर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपीचे) अध्यक्ष आणि खासदार बिलावल भुट्टो जरदारी यांनी पाकला दिला आहे. (भुट्टो यांनी आताच्या इम्रान खान सरकारवर अशी टीका केली असली, तरी त्यांच्या आजोबांची झुल्फिकार अली भुट्टो यांची इच्छा होती की, भारताबरोबर १ सहस्र वर्षे युद्ध केले पाहिजे ! त्यांची आई बेनझीर भुट्टो यांच्या काळातही आतंकवादी सक्रीय होते. त्यामुळे पाकचे सर्वच राजकीय नेते एकाच माळेचे मणी आहेत, हे लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now