(म्हणे) ‘मोदी चीनला घाबरले !’ – राहुल गांधी

  • चीनला राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू हेच घाबरले होते आणि त्यांनी ‘हिंदी-चिनी भाई भाई’चे आत्मघाती धोरण राबवले. यामुळे ८४ सहस्र चौ. कि.मी. भूमी भारताला वर्ष १९६२ च्या चीनसमवेतच्या युद्धात गमवावी लागली, हा इतिहास बाळबोध राहुल गांधी यांना माहिती नसणारच !
  • चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन काँग्रेस का करत नाही ? ‘चीनला प्रत्युत्तर देण्याचे काम केवळ भाजपचेच आहे’, असे राहुल गांधी यांना वाटते का ? तसे आहे, तर काँग्रेसने त्याच्या सत्ताकाळात काय दिवे लावले आहेत, हे जनतेने पाहिले आहे !

नवी देहली – भारताच्या विरोधात चीनने केलेल्या कृतीवर मोदी यांनी एक शब्दही काढला नाही. कमकुवत मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरले. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्यासमवेत झोके घेतात, देहलीमध्ये गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात. ही मोदी यांची ‘चीन नीती’ आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनने मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी ठरवण्याचा संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव फेटाळल्यावरून ट्वीट करत केली आहे.

नेहरूंच्या चुकीमुळेच मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी ठरवण्यात भारताला अपयश ! – भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या या ट्वीटला भाजपने प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, जर तुमच्या पणजोबांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची भारताला मिळत असलेली स्थायी सदस्यत्वाची जागा चीनला भेट म्हणून दिली नसती, तर चीन आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये नसता. तुमच्या कुटुंबाने केलेल्या सर्व चुका भारत सुधारत आहे. भारत आतंकवादाविरुद्धची लढाई नक्कीच जिंकेल. हा विषय मोदी यांच्यावर सोडून तुम्ही चीनच्या शिष्टमंडळांना गुप्तपणे भेटणे चालू ठेवा.

भारताला त्रास होतो, तेव्हा राहुल गांधी यांना आनंद होतो ! – केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद

राहुल गांधी यांच्या ट्वीटला केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले की, जेव्हाही भारताला त्रास होतो, तेव्हा राहुल गांधी यांना आनंद होत असतो. राहुल गांधी यांना माहिती असायला हवे की, विदेशनीती ट्वीटवरून चालत नाही. आतंकवाद्यांच्या विरोधात काँग्रेस कधीच गंभीर होत नाही. मसूद अझहर याला आतंकवादी ठरवण्यासाठी चीन सोडून संपूर्ण जग भारताच्या बाजूने आहे, हा भारताचा विजय आहे. राहुल गांधी यांच्या ट्वीटमुळे पाकिस्तान आणि जैशला आनंदच होत असणार. त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे त्यांना मसूदला जागतिक आतंकवादी घोषित केले नाही, याचा आनंदच झाला असणार.  जेव्हा काँग्रेस सरकारच्या काळात चीनने मसूदला जागतिक आतंकवादी घोषित करण्याला नकार दिला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी असे ट्वीट केले होते का ? तुमचे चीनशी चांगले संबंध आहेत, तर देशासाठी त्याचा लाभ करून मसूदला जागतिक आतंकवादी ठरवण्यासाठी चीनचे मन वळवा. त्याला समजवा.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now