मसूद अझहरला चीन जागतिक आतंकवादी ठरवत नाही, तर मग भारत त्याच्याकडून ६३० कोटी रुपयांचे बुलेटप्रूफ जॅकेट का खरेदी करत आहे ? –  ओवैसी यांचा प्रश्‍न

या प्रश्‍नाचे उत्तर भाजप सरकारने जनतेला दिलेच पाहिजे !

भाग्यनगर – चीनने मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी घोषित करण्याला पुन्हा नकार दिला असतांना भाजप सरकार चीनकडून ६३० कोटी रुपयांचे बुलेटप्रुफ जॅकेट का खरेदी करत आहे ? भारताने ही मागणी केवळ चीनलाच का दिली ? दुसर्‍या देशाकडून ही जॅकेट्स का घेण्यात आली नाहीत ? याचे उत्तर मोदी यांनी देशाला दिले पाहिजे, अशी विचारणा एम्आयएम्चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

‘नकाराधिकार’ म्हणजे काय ?

संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद हे त्याच एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याचे दायित्व आहे. सुरक्षा परिषदेत एकूण १५ सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन ही ५ राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. १० अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून २ वर्षांसाठी केली जाते. सुरक्षा परिषदेच्या ५ स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला ‘नकाराधिकार’ म्हणतात. कोणत्याही निर्णयात या ५ राष्ट्रांचा होकार असावा लागतो. यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now