डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मोदी यांचे आतंकवादाविरोधात कडक धोरण असले, तरी ते राजकीय लाभाने प्रेरित ! – काँग्रेस नेत्या शीला दीक्षित

नवी देहली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणानंतर आतंकवादाच्या विरोधात जितके कडक धोरण असायला हवे होते, तितके ते नव्हते. त्या तुलनेत मोदी यांचे पुलवामानंतरचे आतंकवादाच्या विरोधातील धोरण कडक आहे; मात्र तरीही मोदी यांचे धोरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांची अनेक कामे राजकीय लाभ उठवण्यासाठीच असतात, असे विधान देहलीच्या माजी मुख्यमंत्री आणि येेथील काँग्रेस प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीत केले. त्यांच्या या विधानावरून चर्चा होऊ लागल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, जर माझे विधान वेगळ्या पद्धतीने प्रकाशित केले जात असेल, तर मी त्यावर काही बोलू शकत नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now