मुंबई येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळून २ ठार

मुंबई – १४ मार्चला येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ रेल्वे स्थानकाजवळील कामा रुग्णालयाकडे जाणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून ३४ लोक गंभीर घायाळ झाले. पूल कोसळल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील नागरिकांची धावपळ झाली. पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली, तर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील बाहेर जाणारा १ दरवाजा बंद केला. मृतांचा आणि घायाळांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now