परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

साधकांनो, गेलेला क्षण परत मिळत नसल्याने अशाश्‍वत गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता साधना करून स्वतःतील चैतन्य वाढवण्यासाठी वेळ द्या !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

‘भगवंता, तुझ्या स्मरणात प्रत्येक क्षण जावा, यासाठी मला आयुष्य दे; कारण ‘मी जिवंत आहे’, हे भाग्य मला मिळणे, हाच खरा आनंद आहे !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

‘भगवंता, तू आमच्यासाठी किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव सतत ठेवा !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

आपण ज्याकडे बघतो, त्यात ईश्‍वर असतो. त्याकडे पहाणाराही ईश्‍वरच असतो. याचे स्मरण रहाणे, म्हणजेच नामस्मरण !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांमधील चैतन्य साधकांच्या या जन्मामध्येच वाढवून त्यांना जन्म-मृत्यूच्या पाशातून सोडवत आहेत.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

‘मला बोलते करणारा, मनात विचार घालणारा, क्रिया करवून घेणारा ईश्‍वर आहे’, याचे स्मरण म्हणजे स्वतःतील ईश्‍वराचे स्मरण करणे होय !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण केल्यास जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकावे लागणार नसल्याने त्यातून आनंद घेणे, हे खरे जीवन !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती चैतन्यात असल्याने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय !

– (परात्पर गुरु) पांडे महाराज


कुठलीही कृती घडून गेली की, ती परत घेता येत नाही. यातून इंद्रियनिग्रहाचे महत्त्व लक्षात येते. यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होणे महत्त्वाचे असून मनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

‘प्रार्थना करून भगवंताच्या बुद्धीने, म्हणजे ईश्‍वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना ! सहज झालेली कृती, म्हणजेच कर्म; म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. ‘तोच सर्व करतो’, असा भाव ठेवावा आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करावी.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now