परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले, सनातनच्या प्रत्येक साधकांवर अपार प्रीतीचा वर्षाव करणारे ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९१ वर्षे) यांनी ३ मार्च २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहोत.

सौ. योया वाले

१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता आणि स्पंदने

१ अ. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के

१ आ. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १५ टक्के’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

२. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

टीप : लिंगदेह असल्याने याची टक्केवारी नाही.

२ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह

२ अ १. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहाने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांच्या आशीर्वादाने सत्यलोकाकडे वेगाने प्रयाण करणे : परात्पर गुरु पांडे महाराज हे ‘परात्पर गुरु’ असल्याने असे झाले. (टीप १)

टीप १ : परात्पर गुरु पांडे महाराज ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ झाल्यावरच मोक्षाला जातील ! : देहत्यागानंतर परात्पर गुरु पांडे महाराज मोक्षस्थितीला न जाता सत्यलोकात गेले, जेणेकरून ते साधकांना साहाय्य करू शकतील. सध्या कलियुगात आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ होईपर्यंत सूक्ष्मातून साधकांना साहाय्य लागणार आहे आणि ते साहाय्य करण्यासाठीच त्यांनी हा त्याग केला आहे. परात्पर गुरु पांडे महाराज यांची साधकांवर अपार प्रीती आहे आणि त्यांच्या या प्रीतीमुळे ते स्वतः मोक्षाला जाईपर्यंत त्यांची साधना चालू राहील. ज्याप्रमाणे ईश्‍वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवर अखंड कृपा होत आहे, तशीच परात्पर गुरु पांडे महाराज यांचीही साधकांवर अखंड कृपा होत राहील. परात्पर गुरु पांडे महाराज ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ झाल्यावरच मोक्षाला जातील.

२ आ. देवतातत्त्व

२ आ १. देवतातत्त्वाचा प्रवाह परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडे आकृष्ट होणे : या माध्यमातून देवतांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांना आशीर्वाद दिला, तसेच त्यांच्या लिंगदेहाला सत्यलोकात येण्यास कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी देवता स्वतः त्यांना तेथे घेऊन गेल्या. सर्व देवतांनी सत्यलोकात त्यांच्या लिंगदेहाचे स्वागत केले.

२ आ २. देवतातत्त्वाचे वलय परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहाभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होणे : याचे कारण वरीलप्रमाणेच आहे.

२ इ. आनंद

२ इ १. आनंदाचे वलय परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहाभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होणे : त्यांची  आध्यात्मिक पातळी उच्च (परात्पर गुरु) असल्यामुळे असे झाले.

२ इ २. आनंदाचे वलय परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहातून वातावरणात प्रक्षेपित होणे

२ ई. सगुण चैतन्य

२ ई १. सगुण चैतन्याचे वलय परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहाभोवती कार्यरत होणे : सगुण चैतन्याचे नंतर निर्गुण चैतन्यात रूपांतर झाले.

२ ई २. सगुण चैतन्याचे वलय वातावरणात प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील चैतन्य साधकांना मिळावे, यासाठी असे झाले. सगुण चैतन्याचे निर्गुण चैतन्यात रूपांतर झाल्यानेच सभोवतालच्या वातावरणात दैवी पालट झाला.

२ उ. निर्गुण चैतन्य

२ उ १. निर्गुण चैतन्याचे वलय परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या लिंगदेहाभोवती कार्यरत होणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह सत्यलोकात पोहोचला. तेव्हा असे झाले.

२ उ २. निर्गुण चैतन्याचे वलय वातावरणात प्रक्षेपित होणे

२ ऊ. सत्यलोकतत्त्व

२ ऊ १. सत्यलोकतत्त्वाचे वलय वातावरणात निर्माण होऊन ते कार्यरत होणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांची उच्च आध्यात्मिक पातळी (परात्पर गुरु) असल्यामुळेे त्यांना सत्यलोकात स्थान मिळाल्याने असे झाले.

२ ऊ २. सत्यलोकतत्त्वाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे : त्यामुळे थोडा वेळ वातावरणात चांगला पालट जाणवत होता. (टीप २)

टीप २ : सत्यलोक हा सर्वांत उच्च लोक आहे. सध्याच्या कलियुगांतर्गत कलियुगात पृथ्वीवर सत्यलोकासारखे वातावरण निर्माण होणे अत्यंत दुर्मिळ आहे; परंतु परात्पर गुरु पांडे महाराज यांची उच्च आध्यात्मिक पातळी असल्यामुळे त्यांच्या देहत्यागाच्या वेळी पृथ्वीवर सत्यलोकासारखे वातावरण अनुभवता आले.

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाच्या संदर्भात जाणवलेली अन्य सूत्रे

अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवत होता, तसेच उच्चस्तरीय सकारात्मक शक्ती कार्यरत होती. ही शक्ती वाईट शक्तींना सहन होत नव्हती आणि त्यामुळे वातावरणात जराही वाईट शक्तींचा त्रास किंवा अडथळे नव्हते.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी विचार येत होते. त्यामुळे ते सूक्ष्मातून देवद (पनवेल) आश्रमात होते. त्यांनी सूक्ष्मातूनच परात्पर गुरु पांडे महाराज यांना नमन केले. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांना देवतांनीही आशीर्वाद दिला.

इ. संत आणि साधक यांना चैतन्य अन् आनंद जाणवत होता. काहीजण निर्विचार स्थितीत होते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील चांगली शक्ती (चैतन्य) व्यापक स्वरूपात प्रवाहित होत होती. त्यामुळे संत आणि साधक यांना आतून आनंदाची अनुभूती येत होती. पुढील तीन दिवस साधक याच स्थितीत असतील. (प्रत्यक्षातही तसे होते. – संकलक)

ई. देवद आश्रमाच्या वर जे ‘ऑर्ब्ज’ दिसत होते, ते परात्पर गुरु पांडे महाराज यांचे निर्गुणाकडे मार्गक्रमण होत असल्याचे द्योतक आहेत.

उ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे वास्तव्य असलेली देवद आश्रमातील खोली आता चैतन्यदायी खोली बनली आहे. रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य असलेल्या खोलीत ज्याप्रमाणे पुष्कळ चैतन्य आहे, तसेच चैतन्य परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत आहे. त्यामुळे या खोलीकडे एक ‘आध्यात्मिक ठेवा’ या दृष्टीने पाहिले जाईल.

ऊ. मी सूक्ष्मातून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत गेले आणि तेथे निर्विचार अन् आनंदाची स्थिती अनुभवली. त्या वेळी मी जणू ‘मोक्षाची स्थिती अनुभवत आहे’, असे वाटले. स्वत:चेे अस्तित्वही जाणवत नव्हते. ‘त्या खोलीतच थांबावे आणि तेथून येऊच नये’, असे वाटत होते.

ए. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर ‘ते सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात आले. त्यांनी सर्व संत आणि साधक यांच्यावर दृष्टी टाकली. नंतर ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्याशी सूक्ष्मातूनच बोलले’, असे मला जाणवले. ‘येथून पुढेही ते सत्यलोकातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात रहातील’, असे माझ्या मनात आले.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (५.३.२०१९)

वाचकांना निवेदन

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF