परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या बहुविध गुणांनी नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या महान विभूतीचा जीवनपट उलगडणे खरेतर अशक्यप्रायच ! केवळ भगवंताच्या कृपेमुळेच प.पू. बाबांच्या निवडक छायाचित्रांतून दर्शवलेला त्यांचा अल्पसा परिचय…त्यांच्या चरणी सविनय अर्पण !

जीव-शिवाची भेट ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १८.२.२००५ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची त्यांच्या अकोला येथील घरी जाऊन भेट घेतली तो क्षण ! या भेटीच्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भाव जागृत झाला. परात्पर गुरु पांडे महाराज ‘हा दिवस स्वतःचा वाढदिवस आहे’, असे समजत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ९१ व्या वाढदिवशी त्यांचे औक्षण करतांना परात्पर गुरु पांडे महाराज !  (मे २०१०)

योगतज्ञ दादाजी यांनी ‘प.पू. पांडे महाराज देवद आश्रमात येऊन साधकांसाठी आध्यात्मिक उपाय सांगणार आहेत’, असे २००४ मध्ये केलेल्या भाकितात दिले होते आणि त्याप्रमाणे घडलेही !

‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’ या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ग्रंथासाठी इंदूर येथील स्वामी श्री विष्णुतीर्थ शिक्षा प्रतिष्ठानकडून १६.१०.२००५ या दिवशी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ते पुरस्कार स्वीकारतांनाचा हाच तो अनमोल क्षण !

एक आनंदी कुटुंब !

डावीकडून (बसलेल्या) पत्नी सौ. आशा पांडेआजी, परात्पर गुरु पांडे महाराज. डावीकडून (उभे) स्नुषा सौ. देवयानी पांडे, नातू  कु. सौरभ, नात कु. गौरी पांडे आणि मुलगा श्री. अमोल पांडे (वर्ष २००७)

वर्ष २०१२ मध्ये ‘सनातन शॉप’ या ऑनलाईन संकेतस्थळाचे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची विविध संकेतस्थळे, अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप यांचेही त्यांनी अनावरण केले होते.

परात्पर गुरु पांडे महाराज आणि सौ. आशा पांडेआजी यांच्या विवाहाच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ श्रीकृष्णार्जुनाचे चित्र देऊन त्यांचा देवद आश्रमात सन्मान करण्यात आला. (वर्ष २०१२)

विविध आकृत्या आणि जीवतत्त्व असणार्‍या दगडांचा आगळावेगळा संग्रह प.पू. बाबांनी केला होता. देवद आश्रमात लावलेल्या या संग्रहाच्या प्रदर्शनात नात कु. गौरी आणि मुलगा श्री. अमोल यांना माहिती देतांना प.पू. बाबा, समवेत सौ. आशा पांडेआजी (वर्ष २०१५)

निसर्गाशी समरस होणारे प.पू. बाबा ! प.पू. बाबांची साधकांप्रमाणे निसर्गावरही अपार प्रीती होती. याचा प्रत्यय त्यांनी देहत्याग केल्यानंतर झाडांमध्ये दैवी पालटातून दिसला.

प्रत्येक वर्षी दसर्‍याला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून संत आणि साधक यांना मिळणारा प्रसाद म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरात लिखाण केलेले आपट्याचे पान ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना पाठवलेल्या पानांपैकी हे एक पान आहे. प्रतिवर्षी परात्पर गुरु पांडे महाराज नवनवीन संकल्पना सिद्ध करून त्यानुसार आपट्याचे पान पाठवायचे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९० व्या वाढदिवशी (वर्ष २०१७) त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे आगमन होतांना साधकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तो हा भावक्षण !

परात्पर गुरु पांडे महाराजांनी संकलित केलेला ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ ! या ग्रंथाचे त्यांच्या देहत्यागाच्या दुसर्‍या दिवशी त्यांना ग्रंथ अर्पण करून प्रकाशन करण्यात आले. संत आणि त्यांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते.

एक भावस्पर्शी क्षण ! श्रीगुरूंनी जीवाला आपलेसे केल्यावर ते शेवटपर्यंत त्याच्यावर प्रीतीचा वर्षाव करतात याचे उदाहरण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श केलेला हार परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवाला अर्पण करतांना सनातनचे पू. रमेश गडकरी

देवद आश्रमाचा जणू आत्मा असलेली परात्पर गुरु पांडे महाराजांची खोली

परात्पर गुरु पांडे महाराजांच्या चैतन्यमय अस्तित्वाची प्रचीती देणारी त्यांची खोली आणि चैतन्याने भारीत झालेल्या त्यांच्या वस्तू यांतील चैतन्याची अनुभूती घेऊया.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now