दधिची ऋषींप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व : परात्पर गुरु पांडे महाराज !

कु. मधुरा भोसले

१. सत्यलोकामध्ये ब्रह्मानंदावस्था अनुभवत असल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांना मृत्यूत्तर विधींची आवश्यकता नसणे आणि विधींचे फळ त्यांनी सनातनचे दिवंगत साधक, साधकांचे अतृप्त पितर, अपघात किंवा हत्या यांमुळे मृत्यू झालेले हिंदुत्वनिष्ठ अन् अतृप्त पुण्यात्मे यांना सद्गती मिळण्यासाठी अर्पण करणे : ‘१२.३.२०१९ पासून १५.३.२०१९ पर्यंत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहावसनानंतरच्या १० ते १३ दिवसांचे मृत्यूत्तर विधी सनातनच्या देवद, पनवेल येथील चालू आहेत. खरेतर परात्पर गुरु पांडे महाराज हे सत्यलोकामध्ये ब्रह्मानंदावस्था अनुभवत असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताच मृत्यूत्तर विधी करण्याची आवश्कता नाही; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आज्ञा आणि लौकिकदृष्ट्या धार्मिक विधी करणे आवश्यक असल्याने सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सुपुत्र श्री. अमोल पांडे हे मृत्यूत्तरविधी अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञताभावाने करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आणि हिंदु धर्म यांचा मान राखून सत्यलोकनिवासी परात्पर गुरु पांडे महाराज सर्व विधींचा स्वीकार प्रेमाने करत आहेत; परंतु या विधींची त्यांना आवश्यकता नसल्यामुळे त्यांनी प्रत्येक दिवशी केलेल्या मृत्यूत्तर विधीचे फळ सनातनचे दिवंगत साधक, साधकांचे अतृप्त पितर, अपघात किंवा हत्या यांमुळे मृत्यू झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि अतृप्त पुण्यात्मे यांना सद्गती मिळण्यासाठी अर्पण केले. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मृत्यूत्तर विधी चालू असतांना स्थुलातून पुष्कळ कावळे आणि टिटव्या आश्रमाच्या परिसरातील झाडांवर बसून ओरडत होत्या. विधी संपत आल्यावर कावळे आणि टिटव्या यांचे ओरडणे न्यून झाले. श्राद्धविधीमधील भाताच्या पिंडांवरही ‘ॐ आणि त्रिशूळ’ ही सात्त्विक चिन्हे उमटली होती.

२. ऋषिमुनींप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत असणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील निस्सीम प्रीती, त्याग, व्यापकता यांचे घडलेले दर्शन ! : ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी ऋषिमुनी त्यांच्या तपश्‍चर्येचे फळ जनकल्याणासाठी अर्पण करत होते, त्याप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांच्यासाठी केलेल्या मृत्यूत्तर विधींचे फळ समष्टीच्या कल्याणासाठी अर्पण केले. यावरून त्यांची निस्सीम प्रीती, त्याग, व्यापकता आणि हिंदु धर्माविषयीचा आदर यांची प्रचीती येते. पृथ्वीवरील कार्यकाळ संपला, तरीही परात्पर गुरु पांडे महाराज सत्यलोकात राहून साधकांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत. दधिची ऋषींप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक होऊन कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.३.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now