परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी विशेषांकाच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन…!

अधर्माने ग्रासलेल्या समाजाला कृतीशील ज्ञानसंजीवनी देण्याचे महत्कार्य सनातन संस्थेद्वारे होत असून संतांमधील चैतन्यशक्तीच दैवी कार्याचे नियमन करत आहे. सनातनला लाभलेल्या थोर संतांपैकी एक अनमोल रत्न म्हणजे परात्पर गुरु पांडे महाराज ! ब्रह्मांडातील ज्ञानावर प्रभुत्व असणारे आणि समष्टीकल्याणार्थ अहोरात्र झटणारे परात्पर गुरु पांडे महाराज म्हणजे कलियुगातील एकमेवाद्वितीय विभूती ! माघ कृष्ण पक्ष त्रयोदशीला त्यांंनी देहत्याग केला. देहत्यागानंतर यमदेव त्यांचे प्राण हरण करण्यासाठी आले होते. त्यांना सत्यलोकात घेऊन जाण्यासाठी देवता आल्या होत्या. यातूनच त्यांचा अध्यात्मातील अधिकार मोठा असल्याची कल्पना येते. चार योगांचा अत्युच्च संगम असलेले परात्पर गुरु पांडे महाराज हे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जणू प्रतिरूपच होते ! सनातनच्या साधकांसह हिंदुत्वनिष्ठ अन् हितचिंतक यांनाही त्यांनी कृपावात्सल्याने आपलेसे केले. त्यांनी दिलेल्या मंत्रोपायामुळे जीवघेण्या संकटातून वाचल्याची अनुभूती सहस्रो साधकजिवांनी घेतली. ‘प्रत्येक कर्माला चैतन्याचे अधिष्ठान हवे’, ही अमूल्य शिकवण त्यांनी दिली. आज (फाल्गुन शुक्ल नवमी) त्यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. यानिमित्त त्यांच्या महान कार्याची समष्टीला ओळख व्हावी, या हेतूने हा विशेषांक प्रसिद्ध करत आहोत. स्थूलदेहाने परात्पर गुरु पांडे महाराज आपल्या समवेत नसले, तरी सूक्ष्मरूपाने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदोदित आहे, हे निश्‍चित !

श्री गणेशाची विशेष साधना केली असल्याने परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे एक रूप (व्यष्टी रूप) श्री गणेशात विलीन झाले.

प.पू. बाबा,

धन्य जाहलो लाभली आपली कृपादृष्टी ।
अज्ञानी आम्ही, करता अखंड प्रीतीवृष्टी ॥

शिकवले अनुभवण्या चैतन्याधिष्ठान ।
मिळे ज्ञानबोध करण्या सेवा ही अनुष्ठान ॥

स्थूलकार्याची आपल्या, जाहली जरी पूर्ती ।
सूक्ष्मरूपे समवेत असेल आपली गुरुमूर्ती ॥

परात्पर गुुरु पांडे महाराज यांचा परिचय

परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज यांचा जन्म लोहारी-सावंगा (जिल्हा नागपूर) येथे मार्गशीर्ष प्रतिपदा (२४.११.१९२७) या दिवशी झाला. ‘सब इंजिनिअर’, ‘डेप्युटी इंजिनिअर’ आणि कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी नोकरीत पदभार सांभाळला. वर्ष १९६० मध्ये ते नागपूर येथील प.पू. बापूराव महाराज खातखेडकर यांच्या संपर्कात आले. १९६७ मध्ये त्यांनी त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली. त्यांनी श्रीमद्भगवद्गीता, दासबोध आणि इतर असंख्य तत्त्वज्ञानयुक्त धार्मिक ग्रंथांचे वाचन केले होते. त्यांनी ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’ आणि ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथांची निर्मिती केली. १८.२.२००५ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुरुकृपायोगाचे सुवर्णपदक देऊन सत्कार केला अन् त्यांच्या संतत्वाची ओळख सर्वांना करून दिली. तेव्हापासून ते सनातनशी सर्वार्थाने जोडले गेले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now