कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा एकमेवाद्वितीय सुरेख संगम असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘भक्तीयोगात गोडवा असतो, तर ज्ञानयोगात एकप्रकारे रुक्षता असते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यात भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुरेख संगम होता. इतरत्र असे कुठेही अनुभवता येणार नाही. या संगमामुळे, म्हणजे त्यांच्या बोलण्यातील गोडव्यामुळे आणि ज्ञानामुळे ‘त्यांचे बोलणे सतत ऐकत रहावे’, असे वाटायचे. आमचे जेव्हा दूरभाषवर बोलणे व्हायचे, तेव्हा ८० टक्के बोलणे त्यांचे असायचे आणि मी त्याचा आनंद घेत रहायचो. १८.२.२००५ या दिवशी झालेल्या आमच्या पहिल्या भेटीपासून मी हे अनुभवत आहे.  त्यांचे लिखाण केवळ अध्यात्मशास्त्रासंदर्भात नसायचे, तर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातही सर्वांना समजेल, अशा भाषेत असायचे. त्यामुळे ते सनातन प्रभातमध्ये नियमित प्रकाशित व्हायचे.  आध्यात्मिक कारणांमुळे देश-विदेशांतील साधकांना त्रास होत असल्यास ते रात्री-बेरात्री कधीही उपाय विचारल्यास तत्काळ प्रेमाने सांगायचे आणि नंतर साधकाची चौकशीही करायचे, म्हणजे ते अखंड कर्मयोगीही होते. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे सहस्रो साधकांना लाभ झालेला आहे. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची कृपादृष्टी आम्हा सर्वांवर अखंड राहो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now