महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल ! – सौ. साधना गोडसे, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित महिला

कोल्हापूर, १३ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्मात साजरी केली जाणारी विविध व्रत-वैकल्ये, सण, उत्सव यांमागे अध्यात्मशास्त्र आहे. महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनी केले. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने १० मार्च या दिवशी पाचगाव शाळेजवळ ऋषिकेश पार्क येथे हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या मार्गदर्शनात सौ. गोडसे यांनी ‘ओटी कशी भरावी, कुलदेवतेच्या नामस्मरणाचे महत्त्व, कुंकू लावण्यामागील महत्त्व’ यांसह अन्य धार्मिक कृतींचे महत्त्व सांगितले. या समारंभासाठी ४५० महिला उपस्थित होत्या. याचे आयोजन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांनी केले होते.


Multi Language |Offline reading | PDF