एस्.एस्.आर्.एफ्.च्या वर्धापनदिनाच्या कालावधीत साधिकेला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला एस्.एस्.आर्.एफ.चा वर्धापनदिन असतो. वर्ष २०१७ च्या १३ ते १५ जानेवारी या कालावधीत साधिकेला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. पेट्रा स्टिच

१. वर्धापनदिनाचा आदला दिवस (१३.१.२०१७)

१ अ. साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला अधिक त्रास होणे, त्रास होऊनही माझे मन शांत असणे आणि कोणत्याही विशेष प्रयत्नाविना आपोआप नामजप होणे : ‘या दिवशी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला तीव्र त्रास होत होता. शरिराची किंचित हालचाल झाली, तरी माझ्या तोंडवळ्यावरचे हावभाव पालटत असत आणि घशावरही परिणाम दिसून येत असे. मला होणारा हा त्रास कोणत्याही स्थूल कृतीशी संबंधित नव्हता. अशा प्रकारचा त्रास होऊनही माझे मन शांत होते आणि कोणत्याही विशेष प्रयत्नाविना माझा नामजप आपोआप होत होता.

२. वर्धापनदिनाचा दिवस (१४.१.२०१७)

२ अ. दुपारी उशिरा जेवल्यावर ‘उलटी होणार’, असे वाटू लागणे आणि पुढील २ घंट्यांत ३ वेळा अशाच प्रकारचा त्रास झाला, तरीही शांत वाटणे अन् नामजप आपोआप होणे : या दिवसाच्या आरंभी मला चांगले वाटत होते आणि त्रासाची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. त्या दिवशी दुपारी नेहमीच्या वेळी भूक नसल्याने मी जेवण्याचे टाळले आणि दुपारी ४ वाजता जेवले. त्यानंतर सुमारे अर्ध्या घंट्याने ‘उलटी होणार’, असे मला वाटू लागले. सर्वसामान्यपणे उलटी होण्याआधी पोटात मळमळल्यासारखे होते; परंतु त्या दिवशी मला अशी कोणतीच लक्षणे जाणवली नाही. पुढील २ घंट्यांत ३ वेळा अशाच प्रकारचा त्रास झाला, तरीही मला शांत वाटत होते आणि नामजप आपोआप होत होता.

३. वर्धापनदिनानंतर दुसरा दिवस (१५.१.२०१७)

३ अ. आदल्या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चा वर्धापनदिन असल्याने वातावरणात अधिकाधिक चैतन्य असल्याचे सत्संगात सांगणे आणि स्थूल स्तरावर कोणतेही कारण न आढळल्याने हेच त्रासाचे मूळ कारण असल्याचे लक्षात येणे : या दिवशी मी ‘फेसबूक’वरून प्रसारित केल्या जाणार्‍या ऑनलाइन इंग्रजी सत्संगाच्या दुसर्‍या सत्रात सहभागी झाले. आदल्या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम चालू झाला. तो दिवस एस्.एस्.आर्.एफ्.चा वर्धापनदिन होता आणि ‘वर्षभरातील या एक-दोन दिवसांत वातावरणात अधिकाधिक चैतन्य असते’, असे आम्हाला सत्संगात सांगितले गेले. याआधी साधकांना हे ठाऊक नव्हते. आता हे समजल्याने आणि या दोन दिवसांत होणार्‍या त्रासांचे स्थूल स्तरावर कोणतेही कारण न आढळल्याने ‘हेच माझ्या त्रासाचे मूळ कारण असू शकते’, असे मला वाटले.

३ आ. उत्तरदायी साधकांकडून चैतन्यदायी स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे, भावजागृती होऊन आनंद आणि शांती यांची अनुभूती येणे आणि २ दिवसांपासून प्रलंबित असलेली कामेही अल्पावधीत सहजपणे करू शकणे : संगणकीय प्रणालीद्वारे चालू असलेल्या सत्संगाच्या कालावधीत मला सौ. द्रगानाआजी आणि सौ. राधा मल्लिक यांच्याकडून चैतन्यदायी स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले, तसेच त्यांच्या तोंडवळ्यातून आनंद प्रक्षेपित होत असल्याने ‘सत्संग संपूच नये’, असे मला वाटत होते. सत्संगात माझी भावजागृती झाली आणि सत्संग संपल्यानंतरही कित्येक घंटे मला आनंद अन् शांती यांची अनुभूती आली. त्यानंतर मी मागील २ दिवसांपासून प्रलंबित असलेली घरातील कामेही अल्पावधीत सहजपणे करू शकले.

मला या सुंदर आणि मौल्यवान अनुभूती देऊन भावस्थिती अनुभवायला दिल्याबद्दल ईश्‍वरचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. पेट्रा स्टिच, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया, युरोप. (१७.१.२०१७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF