त्रास असणार्‍या साधकांनो, साधनेचे प्रयत्न पुनःपुन्हा विफल होतात; म्हणून निराश न होता चिकाटीने प्रयत्न चालूच ठेवा !

पू. संदीप आळशी

‘सध्या सूक्ष्मातील आपत्काळ चालू असल्याने बर्‍याच साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. मध्यम ते तीव्र प्रमाणात त्रास असणार्‍या बर्‍याच साधकांना असा अनुभव येतो की, त्यांनी साधनेचे प्रयत्न चांगल्या प्रकारे चालू केले की, २ – ४ दिवसांनंतर त्यांमध्ये काही ना काही कारणामुळे खंड पडतो. असे होण्यामध्येे सर्वसाधारणपणे ६० टक्के भाग हा ‘वाईट शक्तींकडून साधनेला होणारा विरोध’ आणि ४० टक्के भाग हा ‘साधकांची साधनेची तळमळ अल्प असणे’ हा असतो. साधक जरा चांगले प्रयत्न करायला लागले की, वाईट शक्ती लगेच त्यांचे पाय मागे खेचतात. असे पुनःपुन्हा घडल्यामुळे ‘माझ्याकडून साधनेचे प्रयत्न नीट होतच नाहीत’, या विचाराने साधक निराशेत जातात आणि त्यामुळे पुढे प्रयत्न करणेच सोडून देतात. यासंदर्भात साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावा.

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कारागृहात एकीकडे भीषण शिक्षा भोगत असतांना दुसरीकडे कारागृहात राजबंद्यांना देण्यात येणारी अन्याय्य वागणूक, बंदीपालाचे कैद्यांच्या संदर्भातील अमानुष वर्तन इत्यादींच्या विरोधात सहयोगी राजबंद्यांसह आवाज उठवत असत. बंदीपाल सावरकरांचे हे उठाव मोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असे. याविषयीच्या आठवणींमध्ये पुढे सावरकरांनी लिहिले आहे, ‘बंदीपाल आमचा जो जो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करत असे, तो तो आमचा प्रयत्न आम्ही अधिकच त्वेषाने करत असू. शेवटी आमच्या त्वेषापुढे बंदीपालाला हार मानावी लागत असे.’

अंदमानासारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावरकर जे करू शकले, ते आम्हा साधकांना तेवढी प्रतिकूल परिस्थिती नसतांना का जमू शकणार नाही ? साधकांनी वाईट शक्तींकडून होणार्‍या विरोधापुढे न नमता साधनेचे प्रयत्न त्वेषाने, भावाच्या स्तरावर आणि चिकाटीने केले पाहिजेत. मग जय साधकांचाच होईल !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (५.३.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now