आतापर्यंतची २५ वर्षे निरोगी स्थितीत ठेवले आणि ‘टॉन्सिल्स’ काढण्यासाठी शस्त्रकर्म करण्याची वेळ आल्यावर वरिष्ठांच्या माध्यमातून उपचार सुचवून बरे केले, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पिलेली कृतज्ञता !

विविध अनुभूतींतून साधकांची श्रद्धा वृद्धींगत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. अाठवले

१. भावसत्संगात अनुभवलेली ध्यानावस्था !

१ अ. ध्यानावस्थेत ‘स्वतःच्या शरिरात एक स्त्री आहे’, असे जाणवणे : ‘१५.४.२०१७ या दिवशी भावसत्संगात कृतज्ञता व्यक्त करतांना मला ‘श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर मोठे पिवळे फूल वाहिलेे आहे’, असे दिसले. ‘फुलाच्या पाकळ्या त्याच्या मधल्या भागाशी जोडलेल्या असतात. त्याप्रमाणे ‘सर्व साधक श्रीकृष्णाशी जोडले आहेत’, असे मला वाटत होते. भावप्रयोग संपल्यावर मी ध्यानावस्थेत गेले. या स्थितीत ‘एक स्त्री माझ्यात आहे’, असे मला वाटले. काही क्षणांसाठी मला एक विशिष्ट रंग दिसला. तो सुखद लाल रंग असावा. या स्थितीत मला चांगले वाटत होते.

१ आ. स्वतःच्या शरिरात पुरुषाचे अस्तित्व जाणवून तेजस्वी निळा रंग आणि भगवान शिवाचे रूप दिसणे : याच वेळी मला माझ्या शरिरात एका पुरुषाचेही अस्तित्व जाणवून काही क्षणांसाठी थंडपणा जाणवला. नंतर काही क्षण मला तेजस्वी निळा रंग दिसला आणि भगवान शिवाचे रूप दिसले. मी ध्यानावस्थेत असल्याने मला माझ्या देहाची जाणीव नव्हती. खरेतर त्या वेळी घशात झालेल्या जंतुसंसर्गामुळे मला पुष्कळ वेदना होत होत्या.

कु. पेट्रा स्टिच

२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या इच्छेनुसार सर्व घडत आहे’, असा भाव ठेवून सर्व गोष्टी स्वीकारल्यावर शस्त्रकर्म टळल्याची अनुभूती येणे

२ अ. उजव्या कानात पुष्कळ दुखत असूनही आरंभी रुग्णालयात जाण्यास उत्सुक नसणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर रुग्णालयात आहेत’, असा भाव ठेवून रुग्णालयात जाणे : भावसत्संगाच्या आदल्या दिवशीपासून माझ्या उजव्या कानात पुष्कळ दुखत होते. नंतरचे दोन दिवस त्याची तीव्रता आणखी वाढली. आतापर्यंत मी मानसोपचारतज्ञ यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाकडूनही औषध घेतलेले नाही; कारण पाश्‍चात्य वैद्यकीय उपचार आणि आरोग्यसेवा यांवर माझा जराही विश्‍वास नाही. ‘ही व्यवस्था रुग्णाला आजारातून बरे करण्याऐवजी त्याला रुग्णाईत ठेवून अधिकाअधिक धन कसे मिळवता येईल ?’, याचाच विचार करते’, असे मला वाटते. त्यामुळे रुग्णालयात जाण्यास मी नाखुषच असते. काही वेळाने ‘रुग्णालयात जायला हवे’, हे मी स्वीकारले आणि आम्ही रुग्णालयात गेलो. कुठल्याही ठिकाणी गेले, तरी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या आधी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि मी त्यांनाच भेटायला जात आहे’, असे मला वाटत होते.

२ आ. वैद्यकीय चाचण्यांनंतर दुखण्याचे निदान होणे; पण प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धेने स्थिर रहाता येणे : रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांनंतर ‘माझ्या घशातील उजवीकडच्या ‘टॉन्सिल्स’वर फोड आले असून त्यात पू झाला आहे आणि त्यामुळे आवाज न फुटणे, गिळायला त्रास होणे, असे त्रास होत आहेत’, असे निदान झाले. ‘या फोडांवर तातडीने उपचार करणेे किंवा शस्त्रकर्म करून ‘टॉन्सिल्स्’ काढणे आवश्यक आहे’, असे मला सांगण्यात आले. नंतरचे दोन दिवस माझ्या स्थितीत काहीच पालट झाला नाही. तेव्हा ‘टॉन्सिल्स्’विषयीचा निर्णय पुढे ढकलला गेला. त्या वेळी माझ्या मनात एकही विचार आला नाही. ‘जे काही घडणार आहे, ते प.पू. गुरुदेवांच्या इच्छेने घडणार आहे’, असे वाटून ‘या स्थितीतही माझी साधना कशी होईल ?’, याचा मी विचार करत होते.

२ इ. औषधांसमवेत वरिष्ठांनी सुचवलेले उपाय केल्यावर प्रकृतीत सुधारणा होणे आणि पुनः तपासणी केल्यावर ‘शस्त्रकर्माची आवश्यकता नाही’, असे सांगण्यात येणे : या कालावधीत माझे वरिष्ठ मला भेटायला आले अन् त्यांनी मला काही उपचार सुचवले. त्या वेळी मला बरे लवकर वाटावे; म्हणून ‘प.पू. गुरुदेवच वरिष्ठांच्या रूपाने येऊन मला उपाय सुचवत आहेत’, हाच एक विचार माझ्या मनात होता. मी घेत असलेल्या औषधांसमवेत वरिष्ठांनी सुचवलेले काही उपायही मी करून पाहिले आणि एक दिवसातच माझ्या स्थितीत पुष्कळ सुधारणा झाली. नंतर माझी पुनः तपासणी केल्यावर ‘आता शस्त्रकर्माची आवश्यकता नसून केवळ औषधोपचारांनी दुखणे पूर्ण बरे होईल’, असे मला सांगण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यावर आजारी असूनही मला उत्साही वाटत होते. यामुळे मी रात्री ११ पर्यंत घर आवरणे, कपड्यांना इस्त्री करणे अशी कामे केली. त्या वेळी माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते. ‘प.पू. गुरुदेव माझ्या साधनेला प्राधान्य देऊन त्यांच्या इच्छेनुसार ती माझ्याकडून करून घेत आहेत’, असे मला वाटत होते.

३. परात्पर गुरुदेवांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘हे परात्पर गुरुदेवा, गेल्या २५ वर्षांत माझे आरोग्य चांगले राहिल्याने मी क्वचितच आजारी पडले असेन. याचे संपूर्ण श्रेय मी आपल्यालाच देते. या जगातील कित्येक लोकांची प्रकृती माझ्याएवढी चांगली नसूनही ते त्यासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञ असतात. आतापर्यंत मी ‘हे शरीर माझे आहे’, या भ्रमात राहिल्याने मला मिळालेले शरीर आणि चांगले आरोग्य यांप्रती मला कधीही कृतज्ञता वाटली नाही. आठवडाभर मी आजारी होते. या काळात तुम्हीच मला स्थिर ठेवले. भावसत्संगाच्या वेळी वेदना होत असूनही देहाची जाणीव नष्ट होण्याची अनुभूती दिलीत. आपणच मला भावाच्या स्तरावर ठेवून नंतर घडणार्‍या प्रसंगांकडे स्थिरतेने पहाण्याची पूर्वसिद्धता करून घेतली. ‘मी कुणीही नसून जे घडत आहे, त्याचा स्वीकार करणे, इतकेच माझ्या हातात आहे’, याची मला जाणीव झाली. आपल्याच इच्छेने सर्वकाही घडत आहे. ईश्‍वराच्या अज्ञात स्वरूपासमोर मी माझे अस्तित्वच विसरून गेले. या अमूल्य अनुभूती सांगणे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, यांसाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ‘मनाच्या या अवस्थेतून कधीच बाहेर पडू नये’, असे मला वाटते.

‘गुरुदेव, माझे शरीर, वाणी, मन, बुद्धी आणि अहं यांना नष्ट करून मला आपल्या स्वरूपात एकरूप करून घ्या’, हीच आपल्या आनंदस्वरूप चरणकमली शरणागत भावाने प्रार्थना आहेे.’

– कु. पेट्रा स्टिच, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. (२३.४.२०१७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now