पश्‍चात्ताप करावा लागू नये, यासाठी मतदान करा ! – पंतप्रधान मोदी

राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७०, जिहादी आतंकवादाचा निःपात, गोहत्या बंदी आदी विषयांसाठी ज्यांना वर्ष २०१४ च्या निवडणुकीत हिंदूंनी मतदान केले होते, त्या हिंदूंना ५ वर्षांनंतर पश्‍चात्तापच करावा लागला आहे, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नवी देहली – आपण अशी परिस्थिती निर्माण करूया की, जिथे मतदान न केल्याचा पश्‍चात्ताप झाला पाहिजे. यानंतर जेव्हा कधी देशात काही चुकीचे होईल, तेव्हा ती व्यक्ती यासाठी स्वत:ला उत्तरदायी ठरवील. ‘आपण मतदान केले असते, तर अशी वाईट परिस्थिती आज नसती’, असा विचार त्याच्या मनात आला पाहिजे. असा पश्‍चात्ताप करावा लागू नये, यासाठी मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे केले आहे. तसेच मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मायावती यांच्यासह अनेक नेते आणि अभिनेते यांना ‘टॅग’ (ते इतरांनीही पहावे, यासाठी त्यांना पाठवणे) करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी ४ प्रमुख गोष्टींना प्राधान्य देण्यास यात सांगितले आहे. यामध्ये मतदार सूचीमध्ये नाव नोंदणी, स्वतःचे नाव मतदार सूचीमध्ये आहे कि नाही याची निश्‍चिती करणे, मतदानाच्या दिवशी इतर कोणतेही नियोजन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरणा देणे, यांचा उल्लेेख आहे.


Multi Language |Offline reading | PDF