राजस्थानमधून पाकसाठी हेरगिरी करणारा नवाब खान याला अटक

अशा देशद्रोह्यांना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

पाकसाठी हेरगिरी करणारा नवाब खान

जैसलमेर (राजस्थान) – येथे पोलिसांनी पाकसाठी हेरगिरी करणार्‍या ३६ वर्षीय नवाब खान नावाच्या जीप चालकाला अटक केली आहे. खान ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून ‘व्हॉइस कॉल’वर सांकेतिक भाषांचा वापर करून पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयला माहिती पुरवत होता. त्याला एका माहितीसाठी ५ सहस्र रुपये मिळत होते.

१. जयपूरवरून येणार्‍या पर्यटकांना जैसलमेर परिसरात फिरवण्याचे काम नवाब खान करत होता. गेल्या वर्षी तो पाकमध्ये गेला होता. तिथे तो आयएस्आयच्या संपर्कात आला. आयएस्आयने त्याला प्रशिक्षण दिले आणि तेथून भारतात परतल्यावर तो सीमाभागात भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागला.

२. जैसलमेरमध्ये पाकिस्तानी हेर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या काही मासांपासून नवाब खानच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. नवाब हेरगिरी करत असल्याचे पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

३. नवाब खानचा एक नातेवाईक पाकमध्ये रहातो. तोही आयएस्आयचा हस्तक  असल्याचे सांगितले जाते. त्याच्यामुळे नवाब आयएस्आयच्या संपर्कात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF