रेल्वेगाडी विलंबाने येण्याचा नागरिकांना नाहक भुर्दंड

रेल्वेगाडी एक मिनिट विलंबाने धावली, तरी तिकिटावर प्रवाशांची लिखित क्षमायाचना करणारी विदेशी व्यवस्था कुठे, तर रेल्वे विलंबाने येऊनही त्याचा प्रवाशांकडून भुर्दंड घेणारी सध्याची भारतीय व्यवस्था कुठे ! एकाच्या चुकीचा त्रास दुसर्‍यांना होऊ देणारी व्यवस्था हिंदु राष्ट्रात नसेल !

पुणे – रेल्वेस्थानकांवरील फलाटावर प्रवाशांव्यतिरिक्त अन्यांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकिटाची मुदत २ घंटे असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यायचे, असा नियम आहे. तसे न केल्यास त्या वेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे न्यूनतम तिकीट किंवा २५० रुपये अशी दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र काही कारणांमुळे रेल्वेगाडी विलंबाने येत असली, तरी नागरिकांकडून २५० रुपये दंड आकारण्यात येत असल्याने नागरिकांना नाहकचा भुर्दंड सोसावा लागत आहे.


Multi Language |Offline reading | PDF