न्यूझीलंडमध्ये ‘सुपरमार्केट’च्या चुकीमुळे गोमांस खावे लागल्याने शुद्धीकरणयात्रेचा खर्च देण्याची हिंदूची मागणी

कुठे चुकून गोमांस भक्षण करावे लागल्याने संबंधितांकडे शुद्धीकरणाचा खर्च मागणारे विदेशातील धर्माचरणी हिंदू, तर कुठे स्वतःहून गोमांस भक्षण करून वर त्याची बढाई मारणारे भारतातील धर्मद्रोही हिंदू !

जसविंदर पॉल

ऑकलंड (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये जसविंदर पॉल या हिंदु व्यक्तीने ‘सुपरमार्केटमध्ये जाऊन खरेदी केलेल्या खाद्यपदार्थामध्ये गोमांस होते आणि ते खाल्ल्यामुळे धर्म भ्रष्ट झाला आहे. त्यामुळे भारतात जाऊन शुद्धीकरण करण्याचा खर्च देण्यात यावा’, अशी मागणी सुपरमार्केटकडे केली आहे. ‘पाकिटावर लावण्यात आलेल्या चुकीच्या लेबलमुळे गोमांस खाल्ले’, असे पॉल यांनी म्हटले आहे. (असे लेबल सुपरमार्केटकडून चुकून लावण्यात येते कि हिंंदूंनी गोमांस खावे; म्हणून जाणीवपूर्वक लावण्यात येते, हेही शोधणे आवश्यक आहे ! – संपादक) मूळचे भारतीय असणारे जसविंदर पॉल गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये रहात आहेत.

जसविंदर पॉल यांनी स्थानिक वृत्त संकेतस्थळाच्या प्रतिनिधीला सांगितले की, मी सुपरमार्केटच्या चालकांना म्हटले आहे की, शुद्धीकरणासाठी भारतात जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी ४ – ५ आठवडे तेथे रहावे लागेल. विधी करावे लागतील. त्यामुळे प्रवासाचा सर्व खर्च त्यांनी करावा.

सुपरमार्केटकडून पॉल यांची क्षमा मागण्यात आली आहे. त्यांनी ‘गिफ्ट व्हाऊचर’ (भेटवस्तू) देण्याची सिद्धता दर्शवली आहे. पॉल यांनी मात्र त्यासाठी नकार दिला आहे, तसेच त्यांनी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF