श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांना सूचना

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या निमित्ताने प्रबोधनासाठी नेहमीच्या ठिकाणी पुढील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

१. ‘रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !’ आणि ‘बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा !’ ही ‘ए ५’ आकारातील २ हस्तपत्रके

२. ‘रामराज्य साकारणे तुमच्याच हाती’ हा १० फूट × ८ फूट या आकारातील १ फलक

३. २.२५ फूट × ३.५ फूट आकारातील खालील ४ फलक

अ. श्रीरामाचे पूजन कसे करावे ?

आ. रामराज्य साकारणे तुमच्याच हाती

इ. मारुतीची उपासना

ई. मारुतीला शेंदूर, तेल अन् रुईची पाने का आणि कशी वाहातात ?

या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या उत्सवांची ठिकाणे, देवस्थाने आदी सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now