‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’कडून ढाका येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

मानवी साखळीमध्ये सहभागी झालेले हिंदू

ढाका – ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या हिंदूंसाठी कार्य करणार्‍या मानवाधिकार संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च २०१९ या दिवशी ढाका येथे साजरा केला. या वेळी महिला, मुले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. महिलादिनाच्या निमित्ताने अनेक जणांनी विचार व्यक्त केले. बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांसाठी मानवी हक्कांची मागणी करत मानवी साखळी करून निषेध मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशच्या विविध प्रांतांमध्ये धर्मांधांकडून झालेल्या बलात्कार, अपहरण, धर्मांतर, भूमी अतिक्रमण, मंदिरे आणि घरे यांची जाळपोळ, देवतांच्या मूर्तींची विटंबना इत्यादी अत्याचारांना बळी पडलेले अनेक जण या वेळी उपस्थित होते. (राज्यकर्ते मग ते बांगलादेशाचे असो किंवा भारताचे हिंदूंच्या रक्षणासाठी काही करत नाहीत. हिंदूंनी साधना करून आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वयंसिद्ध होणे, हाच त्यावरील उपाय आहे ! – संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF