सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार

सांगली/कोल्हापूर – विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २४ मार्चअखेर, तर सांगली जिल्ह्यात २५ मार्चअखेर हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये जिल्ह्यांत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक अथवा रस्त्यावर एकत्र फिरण्यास मनाई केली आहे. हा आदेश धार्मिक विधी यांना लागू नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now