देशाचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे ! – पत्रकार एन्. राम यांचा आरोप

ज्येष्ठ पत्रकार एन्. राम

मुंबई – आपल्या देशाचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल विमानखरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून ही गोष्ट अधोरेखित होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार एन्. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या परिसंवादात केले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे १० मार्च या दिवशी ‘राफेल – मोदीज नेमेसिस ?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते.

सरकारने युरो फायटरसारखे चांगले पर्याय असतांना राफेलची निवड केली. ‘दसॉल्ट’शी करार करतांना समांतर वाटाघाटी केल्या गेल्या. एवढेच नव्हे, तर या करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आल्या. रशिया, अमेरिका यांच्याशी केलेल्या करारांमध्ये अशा तरतुदी नाहीत, हे खरे असले, तरी ते त्या देशांच्या सरकारांशी केलेले करार असल्याने त्यात तशी आवश्यकता नव्हती; मात्र राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी आस्थापनाशी होत होता. अशा वेळी या तरतुदी काढण्याचे प्रयोजन काय ? या आणि अशा अनेक संशयास्पद गोष्टींमुळे राफेल खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते, असे राम म्हणाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now