पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड

भाजपच्या राज्यात अशी घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! याला उत्तरदायी असणार्‍यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा होण्यासाठी आणि पुन्हा अशी घटना न घडण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील मोहल्ला बाजारामधील शिवमंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मुझफ्फरनगरमध्ये शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंदबुद्धीच्या व्यक्तीला पकडले होते; मात्र लोकांनी त्याला सोडण्यास सांगितले होते. (सर्वच ठिकाणी पोलीस अशा घटनांच्या वेळी एखाद्या मंदबुद्धी व्यक्तीवर याचे खापर फोडून मोकळे होतात आणि प्रत्यक्ष तोडफोड करणार्‍या धर्मांधांना पाठीशी घालतात ! यातून हिंदूंमध्ये संताप होऊ नये, त्यांचा उद्रेक होऊ नये, यासाठी हा खोटारडेपणा पोलीस करत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF