जपान आणि स्वित्झर्लण्ड येथील लोकांच्या तुलनेत भारतियांमध्ये लवकर वृद्धत्व जाणवते ! – अभ्यासाचा निष्कर्ष

नवी देहली – ‘द लांसेट पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार भारतात रहाणार्‍या लोकांना जपान आणि स्वित्झर्लण्डमध्ये रहाणार्‍या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवते किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो, असे समोर आले आहे. या लोकांना वृद्धत्वाच्या नकारात्मक प्रभावांशीही झगडावे लागते, असेही यात म्हटले आहे.

१. या देशांमध्ये सर्वाधिक आणि सर्वांत अल्प वयाच्या लोकांमध्ये जवळपास ३० वर्षांचे अंतर आहे. सरासरी ६५ वर्षांच्या एखाद्या व्यक्तीला होणार्‍या वयासंबंधी समस्या आणि जपान अन् स्वित्झर्लण्डमध्ये रहाणार्‍या ७६ वर्षांची एखादी व्यक्ती, तसेच पापुआ न्यू गिनी बेटावर रहाणार्‍या ४६ वर्षांच्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्यांचा स्तर हा समान असतो. भारतात रहाणार्‍या लोकांना आरोग्यासंबंधी याच समस्या ६० वयापर्यंत जाणवू लागतात.

२. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’मधील अभ्यासिका एंजेला वाई चांग म्हणाल्या की, वयासंबंधी आरोग्य समस्या या लवकर सेवानिवृत्ती, अल्प कार्यक्षम आणि आरोग्यावर अधिक खर्च यांचे कारण ठरू शकतात. आरोग्य प्रणालीवर चांगल्याप्रकारे काम करणार्‍या सरकारी आणि इतर संस्थांनी लोकांना वयासंबंधी नकारात्मक प्रभाव कधीपासून दिसायला लागतो यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now