जागतिक शांततेच्या दृष्टीने आतंकवाद धोकादायक ! – मोदी

जागतिक शांततेपेक्षा भारतासाठी आतंकवाद अधिक धोकादायक ठरला आहे. त्यावर मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत काय केले ?, ते त्यांनी सांगायला हवे !

नवी देहली – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रप्रमुखांशी दूरभाषवरून चर्चा केली. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांच्याशी चर्चा करतांना मोदी यांनी ‘आतंकवाद हा जागतिक शांततेच्या दृष्टीने धोकादायक आहे’, असे म्हटले. ‘आतंकवादाच्या विरोधात सर्व देशांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे’, असेही ते म्हणाले. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातचे राजे शेख महंमद बिन झायेद यांच्याशीसुद्धा चर्चा केली.


Multi Language |Offline reading | PDF