पाकिस्तानी सैन्य काश्मिरी लोकांना आत्मघातकी आक्रमणासाठी दबाव टाकते !

पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांचे संयुक्त राष्ट्रात प्रतिपादन

पाकपुरस्कृत आतंकवाद !

जिनेव्हा (स्वित्झर्लण्ड) – येथे आयोजित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ४० व्या अधिवेशनामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्यांनी पाकच्या अत्याचारांविषयीचे विचार मांडले, तसेच पुलवामा येथील आक्रमणाचा त्यांनी निषेध केला. ‘युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे अध्यक्ष एस्. अली कश्मिरी यांनी म्हटले की, पाकचे सैन्य उघडपणे काश्मिरी लोकांना आत्मघातकी आक्रमण करण्यासाठी दबाव टाकते. ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

आतंकवाद्यांची ठिकाणे नष्ट करण्याची हीच योग्य वेळ !

पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्ते एम्. हसन म्हणाले की, आता वेळ आली आहे की, पाकमधील सर्व आतंकवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले पाहिजे. मग ते पाकमध्ये असोत कि पाकव्याप्त काश्मीरमध्ये. पाक सरकारने या आतंकवादी ठिकाणांना नष्ट करण्याचे दायित्व घेतले पाहिजे आणि या आतंकवाद्यांपासून सुटका करून घेतली पाहिजे. हे आतंकवादी केवळ स्थानिक लोकांचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय शांतता नष्ट करत आहेत. (पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्त्याला जे वाटते, ते भारत सरकारला का वाटत नाही ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now