आतंकवाद्यांचा त्रास किती दिवस सहन करणार । एक ना एक दिवस सहनशीलतेचा बांध तुटणार ॥

कु. चैत्राली कुलकर्णी

आतंकवाद्यांचा त्रास किती दिवस सहन करणार ।
एक ना एक दिवस सहनशीलतेचा बांध तुटणार ॥

आतंकवाद्यांनी अतिरेक केला ।
जेव्हा पुलवामा हल्ला झाला ॥ १ ॥

सैनिक करतात आपले रक्षण ।
पाकिस्तान करत आहे त्यांचे भक्षण ॥ २ ॥

भारताने सहन केला पुष्कळ त्रास ।
आता आतंकवाद झाला बस्स ॥ ३ ॥

पाकिस्तान, तुझ्या पापांचा भरला घडा ।
थांब तुला शिकवू चांगलाच धडा ॥ ४ ॥

सैनिक आणि आतंकवादी यांत असतो फरक ।
भारत होईल आतंकवाद्यांसाठी हानीकारक ॥ ५ ॥

सैनिक लढवतील वेगवेगळ्या युक्त्या ।
भारताला मिळेल आतंकवाद्यांपासून मुक्ती ॥ ६ ॥

आतंकवाद्याचा त्रास किती दिवस सहन करणार ।
एक ना एक दिवस सहनशीलतेचा बांध तुटणार ॥ ७ ॥

– कु. चैत्राली कुलकर्णी (वय १४ वर्षे),
अंबरनाथ, ठाणे. (२२.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF