(म्हणे) ‘काश्मीरच्या निवडणुका पुढे ढकलून मोदी यांची शरणागती !’ – ओमर अब्दुल्ला

  • जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेऊन पुन्हा राष्ट्रघातकी काश्मिरी नेत्यांच्या हातात राज्याची सत्ता देण्याचा मूर्खपणा भाजप करणार नाही, असेच जनतेला वाटते !
  • काश्मीरमध्ये निवडणुका न घेता तेथे कायमस्वरूपी राष्ट्रपती राजवट ठेवून आतंकवाद्यांचा, दगड फेकणार्‍या धर्मांधांचा, तसेच त्यांना समर्थन देणारे राजकीय नेते अन् फुटीरतावादी यांचा बंदोबस्त करावा, अशीच राष्ट्रप्रेमी जनतेची मागणी आहे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेसमवेत न घेता पुढे ढकलून पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान, आतंकवादी आणि हुर्रियत कॉन्फरन्स यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरणार आहेत; मात्र मोदी अशा प्रकारे जागतिक स्तरावर स्वतःच्या अपयशाची स्वीकृती देतील, याचा मी कधीही विचार केला नव्हता.’’ अशा प्रकारचे ट्वीट काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले आहेत. (मोदी यांनी अशा प्रकारची विधाने करणार्‍यांना कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF