(म्हणे) ‘मसूद अझहरला कोणी सोडले, हे मोदी यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सांगावे !’ – राहुल गांधी

  • मसूदला सोडण्यावरून आता टीका करणार्‍यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, ‘आतंकवाद्यांना तात्काळ फाशी द्या, विमानातील भारतीय नागरिक ठार झाले, तरी चालतील’, असे देशातील एकाही राजकीय पक्षाने आणि भारतीय जनतेनेही त्या वेळी म्हटले नव्हते !
  • मसूद अझहर याला सोडण्यामागे भारतातील सर्व राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत, हे ‘बाळबोध’ राहुल गांधी यांना माहिती नाही, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !
  • सर्व पक्षांनी आतंकवाद्यांची सुटका करून विमानातील नागरिकांचे प्राण वाचवावेत, असेच सरकारसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते ! या बैठकीचे पुरावेही आहेत, हे राहुल गांधी यांना माहिती नसणारच !
  • अजित डोवाल तेव्हा केवळ ‘आतंकवाद्यांशी चर्चा करणारी व्यक्ती’ होती; कारण ते त्या वेळी गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांच्याकडे आतंकवाद्यांना सोडण्याचा अधिकार नव्हता, हेही राहुल गांधी यांना माहिती नसणारच !
  • ‘मसूद याला सोडले नसते, तर सर्व नागरिकांना ठार करण्यात आले असते’, हे काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना चालले असते का ? याचे उत्तर त्यांनी आता द्यायला हवे !

नवी देहली – ‘जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याची वर्ष १९९९ मध्ये भारताच्या कारागृहातून सुटका कोणी केली होती ? सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच याचे तडजोड करणारे होते, हेही मोदी यांनी पुलवामातील त्या हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांना सांगावे, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच त्यांनी यासमवेत वर्ष १९९९ मध्ये मसूदच्या सुटकेच्या वेळचे अजित डोवाल यांची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

वर्ष १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असतांना विमान अपहरणात भारताने मसूद अझहर याच्यासहित काही आतंकवाद्यांची सुटका केली होती. आतंकवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सचे विमान १५० प्रवाशांसह अपहरण करून अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले होते.

लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकातील दावा

लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘माय कन्ट्री, माय लाईफ’ या पुस्तकात कंदहार अपहरण प्रकरणातील घटनेविषयी पृष्ठ क्रमांक ६२२, ६२३ आणि ६२४ वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रीजेश मिश्रा यांना तत्कालीन गुप्तचर विभागाचे संचालक अजित डोवाल यांनी आतंकवाद्यांची सुटका करण्याला विरोध केला होता. २४ घंट्यांत विमान सोडवून आणण्याची वेळ त्यांनी मागितली होती. या कारवाईत ४-५ जण ठार झाले, तरी उर्वरितांना वाचवू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

राहुल गांधी यांच्याकडून मसूद अझहर याचा ‘अझहर जी’ म्हणून उल्लेख

यापूर्वी ओसामा बिन लादेन याला ‘लादेन जी’ म्हणणार्‍या काँग्रेसकडून आतंकवाद्यांचा होणारा हा आदर लक्षात घ्या !

 

‘मसूद अझहर जी’

राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेमध्ये बोलतांना मसूद अझहर याचा उल्लेख करतांना ‘मसूद अझहर जी’ असा उल्लेख केला.


Multi Language |Offline reading | PDF