वॉशिंग्टन (अमेरिका) येथील विधानसभेला वेदांतील संस्कृत मंत्रपठणाने प्रारंभ

वॉशिंग्टन (अमेरिका) – वॉशिंग्टन राज्याच्या ऑलिंपिया या राजधानीत भरलेल्या नवनिर्वाचित विधानसभेच्या बैठकीला वेदांतील संस्कृत मंत्रपठण करून प्रारंभ झाला.

अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी या मंत्रांचे पठण केले. श्री. झेद यांनी ऋग्वेदातील मंत्रांनी प्रारंभ करून ‘तमसो मा ज्योतिर्गमय…’ हा श्‍लोक आणि श्रीमद्भगवद्गीतेतील काही श्‍लोक म्हटले. तसेच ओमच्या उच्चारांनी सांगता केली. (निधर्मी अमेरिकेत असे होऊ शकते, तर भारतातील विधानसभा आणि संसद येथे असे का होऊ शकत नाही ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now