साकळी दंगलप्रकरणी पलायन केलेल्या धर्मांध आरोपींना त्वरित अटक करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

साकळी (जळगाव) – येथे २६ जानेवारीला धर्मांधांनी टिपू सुलतानचे छायाचित्र ग्रामपंचायत कार्यालयात लावणे आणि ग्रामपंचायत कार्यालयावर ऊर्दूमध्ये नाव लिहिणे यावरून नियोजित दंगल घडवून आणली होती. या वेळी हिंदूंच्या घरात घुसून महिलांची छेड काढणे, लाठ्या घेऊन हिंदु वस्तीत दहशत पसरवणे, वाहनांची नासधूस करणे यांसारखे प्रकार घडले होते. त्यानंतर ४७ धर्मांधांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यांतील काही आरोपींना अटक झाली असून काही आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. तरी त्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी साकळी ग्रामस्थांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF