महिलांनी नियमित साधना केल्यास धकाधकीच्या जीवनातही आनंदी रहाणे शक्य ! – सौ. अंजली कोटगी, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शनासाठी उपस्थित धर्मप्रेमी महिला

कागल (जिल्हा कोल्हापूर), ११ मार्च (वार्ता.) – भारतीय इतिहासात राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक महिलांनी धर्माचरण करत क्षात्रतेज दाखवले आहे. त्याचप्रकारे महिलांनी नियमित साधना केल्यास धकाधकीच्या जीवनातही त्यांना आनंदी रहाणे शक्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अंजली कोटगी यांनी केले. येशीला पार्क येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या मार्गदर्शनासाठी ४० धर्मप्रेमी उपस्थित होते. याचे आयोजन गृहमंचाच्या सदस्या सौ. सुषमा पाटील यांनी केले होते.

विशेष – या वेळी उपस्थित महिलांपैकी काही जणींनी ‘येथील तरुणींना नियमितपणे धर्मशिक्षणाची, तसेच सनातनच्या ग्रंथांचीही माहिती द्या. ही माहिती तरुणींनी आत्मसात केल्यास त्यांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही बाजूंचा उद्धार होईल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF