जगासमोर गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची !

‘भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण केल्यानंतर भारतीय वैमानिक श्री. अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानच्या सीमारेषेत पकडले गेले; पण त्यांनी पाकिस्तानला कुठलीही माहिती दिली नाही. शेवटी भारताच्या दबावामुळे श्री. अभिनंदन यांना पुन्हा भारताकडे सुपुर्द करणे पाकिस्तानला भाग पडले. याविषयी मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

कु. उज्ज्वला ढवळे

‘मिग-२१ बायसन’च्या वीर योद्ध्याने
शत्रूचे आधुनिक ‘एफ्-१६’ नष्ट केले ।
सतर्क होते शूरवीर
अभिनंदन शत्रूच्या भूमीत उतरले ॥ १ ॥

केली गुंडाळी गुप्त बातम्या असलेल्या कागदाची ।
गिळंकृत करतांना नाही केली पर्वा जिवाची ।
उर्वरित गुप्त कागद अर्पण
करण्यासाठी घेतली मदत जलदेवतेची ॥ २ ॥

भारताचा शूरवीर शत्रूच्या गोटात चुकून गेला खरा ।
पण खर्या अर्थाने दाखवला
त्याने हिंदुस्थानचा होरा ॥ ३ ॥

धन्य धन्य झाले त्या मातेचे ऊर ।
जिच्या पोटी उपजला असा पवनपुत्र वायूवीर ॥ ४ ॥

अभिमान आहे विंग कमांडर अभिनंदनचा ।
जगाने घेतले डोक्यावर
भारतमातेच्या सुपुत्राला ॥ ५ ॥

धन्य धन्य झाली कूस या मातृभूमीची ।
भावी पिढीला गरज
होती अभिनंदनसारख्या आदर्शाची ।
जगासमोर गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची ॥ ६ ॥

– कु. उज्ज्वला ढवळे, चिंचवड, जिल्हा पुणे. (१.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF