निवडणूक प्रचारात सैनिकांची छायाचित्रे वापरू नका ! – निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना आदेश

  • निवडणूक जिंकण्यासाठी सैनिकांचा वापर करण्याचा प्रयत्न करणारे राजकीय पक्ष कधी सैनिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात का ?
  • आतंकवाद्यांच्या आक्रमणात सैनिकांना नाहक हुतात्मा होऊ देणारे राजकीय पक्ष सत्तेवर आल्यावर आतंकवादाचा निःपात करण्याचा कधी प्रयत्न करतात का ?
  • निवडणुकीसाठी सैनिकांचा वापर करण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकीय पक्षांच्या नेत्यांना युद्धाच्या वेळी सैनिकांसमवेत सीमेवर पाठवले पाहिजे !

नवी देहली – निवडणुकीच्या प्रचारामध्ये सैनिक किंवा सैन्याधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर करू नका, असा आदेश निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयीचे प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे. भारतीय वायूदलाने केलेले सर्जिकल स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन, पाकचे पाडलेले विमान, पुलवामा येथील आक्रमण अशा घटनांचा वापर स्थानिक, तसेच राष्ट्रीय पक्षांतील नेत्यांनी फलकावर केल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF