पाकच्या प्रत्येक आक्रमणाला १० पट तीव्रतेने प्रत्युत्तर देणे, हे राष्ट्र आणि धर्म यांसाठी आवश्यक आहे !

श्री. संदीप जगताप

‘आतंकवाद हा शांतीची कबुतरे सोडून किंवा शांती चर्चा करून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मोगलांवर आक्रमण करून संपवावा लागतो आणि हे २५ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई आक्रमण करून दाखवून दिले. या दिवशी मोदी सरकारने हवाई आक्रमणाद्वारे पुलवामा आक्रमणाचा सूड घेऊन खर्‍या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बाणा अंगीकारला. मागील ७१ वर्षांहून अधिक कार्यकाळात होऊन गेलेल्या अनेक राज्यकर्त्यांनी पाकिस्तानबरोबर शांतीचे अनेक निष्फळ प्रयत्न केले. भारताने ईदला पाठवलेल्या मिठाईला पाकिस्तान सैन्याने गोळ्यांद्वारे प्रत्युत्तर देऊनही भारतीय राज्यकर्त्यांनी शांतीचे कबुतरे उडवून एकप्रकारे स्वत:ची निष्क्रीयताच आतापर्यंत व्यक्त केली होती. मोदी सरकारने या वृत्तीत काही अंशी पालट केल्याचे लक्षात येते.

बालाकोट येथील आक्रमणानंतर काही भाजपविरोधी नेत्यांनी केलेल्या विधानांना लोकशाहीचे अपयश म्हणावे कि स्वार्थाची आणि सत्तालालसेची परिसीमा म्हणावी ? कोणी देशहितार्थ पाऊल उचलत असेल, तर त्याचे खच्चीकरण करून अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे अनेक भारतीय नेत्यांना दुसरे काही कामच नसते का ? किमान शत्रूराष्ट्रांच्या विरोधातील युद्धजन्य परिस्थितीतही राजकीय नेत्यांनी आंतरिक मतभेद बाजूला ठेवून एक राष्ट्र म्हणून उभे न राहणे, हे देशाचे फार मोठे दुर्दैव आहे.

दया आणि क्षमा हे गुण व्यक्तीगत जीवनात आवश्यक असतात; पण ज्या वेळी राष्ट्राचा आणि राष्ट्रवासियांच्या जीवनाचा प्रश्‍न येतो, त्या वेळी ज्यांच्याकडे राष्ट्राचे नेतृत्व आहे, त्यांनी शत्रूराष्ट्राचा १:१० या प्रमाणात म्हणजे दहापट नरसंहार करणे हेच राष्ट्र-धर्मासाठी आवश्यक आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानचे आक्रमण थांबले नव्हते. त्यानंतर छुप्या आक्रमणांमध्ये अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झाले. त्याचप्रमाणे या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तान अधिक तीव्रतेने आक्रमण करणारच आहे, त्यामुळे मोदींनीही पाकिस्तानच्या प्रत्येक आक्रमणाला किमान दहापट तीव्रतेने प्रत्युत्तर द्यावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.’

– श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF