साधकांना भगवंताच्या भक्तीची ओढ लावणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

मग भक्तीचे महत्त्व सार्‍यांनाच कळले ।
भक्ती अपार ठेवावी मनी ।
मग भगवंत भेटतो प्रत्येक क्षणी ॥ १ ॥

भक्ताने ‘मज काहीच येत नाही’, या भावे जावे गुरूंपाशी सदा ।
मग गुरुच देतात सर्वकाही भक्ताला ॥ २ ॥

करूनी अपार भक्ती, जावे शरण गुरूंना ।
मग गुरुनाथांना वाटते, घ्यावे जवळ भक्ताला ॥ ३ ॥

अशा प्रकारे भक्ताच्या भक्तीमुळे भगवंताला यावे लागले ।
मग भक्तीचे महत्त्व सार्‍यांनाच कळले ॥ ४ ॥

– देवाला अपेक्षित असे होण्यासाठी आतुरलेली,

कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF