‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनातून होळीच्या पवित्र रंगांना ‘डाग’ म्हणत अन्य धर्मियांना मोठे दाखवण्याचा प्रयत्न

विदेशी आस्थापन ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून हिंदु धर्माचा पुन्हा अवमान

होळीच्या दिवशी हिंदू मुसलमानांवर जाणीवपूर्वक रंग फेकतात, असे दाखवण्याचा प्रयत्न

होळीच्या पवित्र रंगांना ‘डाग’ म्हणणार्‍या ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ला मोहरमच्या वेळी निघणारे रक्त आणि बकरी ईदच्या दिवशी होणारी गोहत्या दिसत नाही का ? यावर कधी विज्ञापन करण्याचा प्रयत्न हे आस्थापन करील का ?

मुंबई – ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या विदेशी आस्थापनाचे उत्पादन असलेल्या ‘सर्फ एक्सेल’ या कपडे धुण्याच्या चुर्‍याच्या होळीच्या निमित्ताने बनवलेल्या ध्वनीचित्रफितीच्या विज्ञापनातून होळी सणाचा अवमान करण्यात आला आहे. यातून अन्य धर्मियांसाठी हिंदूंच्या पवित्र रंगांचा उल्लेख ‘डाग’ असल्याचे सांगत त्यांचा अवमान करण्यात आला आहे. मुसलमानांचे नमाज हिंदूंपेक्षा अधिक पवित्र असल्याचे सांगण्याचा प्रयत्न या विज्ञापनातून करण्यात आल्याचे लक्षात येते. होळी आणि नमाज यांचा काहीच संबंध नसतांना अशा प्रकारचे विज्ञापन बनवून ‘हिंदू होळीच्या दिवशी मुसलमानांवर जाणीवपूर्वक रंग फेकतात’, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याविषयी अवमान करणारे ट्वीट या आस्थापनाकडून करण्यात आले होते. हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर ते मागे घेण्यात आले.

या विज्ञापनात एक लहान हिंदु मुलगी होळीच्या दिवशी सायकल चालवत गल्ल्यांमधून जात असतांना तिच्यावर रंग फेकण्यात येतो. ती मुलांना ‘रंग फेकायचा आहे, तर फेका’, असेही सांगते. शेवटी रंग फेकणे थांबल्यावर ती सायकल थांबवून  मुलांना विचारते की, तुमचे रंग संपले का ? मुलांनी ‘नाही’ म्हटल्यावर एका घरातून पांढर्‍या रंगाचा सदरा आणि पायजमा घातलेला लहान मुसलमान मुलगा बाहेर पडतो. ही मुलगी त्याला ‘रंग संपले आहेत. मी तुला सोडते’, असे सांगत सायकलवर बसवून मशिदीत नेऊन सोडते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘‘मी नमाजपठण करून परत येतो.’ त्या वेळी ती मुलगी म्हणते, ‘नंतर रंग टाकला जाईल.’ (याचा अर्थ ‘हिंदु जाणीवपूर्वक मुसलमानांना होळीच्या दिवशी रंग लावतात’, असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे लक्षात येते ! – संपादक) त्याच वेळी एक आवाज येतो, त्यात म्हटले जाते की, ‘आपल्या लोकांना साहाय्य करतांना डाग लागल्यास डाग चांगले आहेत!’ (यातून ‘मुसलमानांना रंग लागू नये; म्हणून स्वतःला रंग लागल्यास चालेल’, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे !  – संपादक)

धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.

फेसबूक : facebook.com/surfexcelindia/

ट्विटर : twitter.com/surfexcelindia?lang=en

इमेल : [email protected]

टोल फ्री क्रमांक : १८००-१०-२२-२२१

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now