मुंबईतील नागरिकांच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रहित होणार !

मुंबई – येथील नागरिकांच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ९ मार्च या दिवशी घेतला. या निर्णयाचा लाभ १७ लाख ५७ सहस्र ८१८ घरांना होणार असून पालिका ३५० कोटी ५५ लाख रुपयांच्या वार्षिक महसुलापासून वंचित रहाणार आहे. ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात ६० टक्के सवलत देण्यात आली असून त्याचा लाभ ७५ सहस्र घरमालकांना होईल. त्यामुळे पालिकेचा २५० कोटींचा महसूल बुडणार आहे. १ जानेवारी २०१९ पासून ही सवलत लागू करण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुंबई-ठाणे येथील महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आल्यास ५०० चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रांचा मालमत्ता कर रहित करण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. भाजपसह युती करतांना ही अट ठेवली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now