धुळे येथील लळींग पथकर नाक्यावर गोमांस पकडले

गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची ‘ऐशी कि तैशी’ ! पोलीस स्वतःहून गोमांस वाहून नेणार्‍यांवर कारवाई करत नसल्याने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचे काम करावे लागत आहे !

धुळे – शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग पथकर नाक्याजवळ गोमांस वाहून नेणारी बोलेरो गाडी बजरंग दलाचे संजय शर्मा आणि अन्य कार्यकर्ते यांनी पकडली. पकडण्यात आलेले गोमांस आणि गाडीची किंमत ३ लाख रुपये आहे. लळींग पथकर नाक्याजवळील बोलेरो पिकअप गाडीतून गोमांस इतरत्र जात असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग केला. गाडीचा चालक शेख शाखीर शेख निसार, क्लिनर वसीम खान शब्बीर खान यांना कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF