हिंदु समाजाला धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता दर्शवणारे प्रसंग

१. दुकानाला ‘असुर डेअरी’ सारखे अशास्त्रीय नाव देणारे जन्महिंदू !

श्री. निमिष म्हात्रे

‘वर्धा येथे एक दुधाची डेअरी आहे. तिला ‘असुर डेअरी’, असे नाव दिले आहे. ‘असुर डेअरी’ सारखे नाव दुकानाला देणारे असुरांप्रमाणे अयोग्य, असात्त्विक आणि अशास्त्रीय कृती करून असुरांची भक्ती करणारे असतील’, असे वाटते. ‘यातून असुरांचे गुण कोणी आत्मसात करणार तर नाही ना ?’, असाही प्रश्‍न पडतो. यावरून ‘समाजाला नैतिकतेसमवेत धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे लक्षात येते.’ – एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. दूरचित्रवाहिनीवरून रावणाचा उदोउदो करणार्‍या मालिका दाखवून अनैतिकतेला प्रोत्साहन देणारे जन्महिंदू !

‘काही वर्षांपूर्वी एका खासगी दूरचित्रवाहिनीवर ‘रावण’ नावाची मालिका दाखवली होती. त्यात रावणाला कोणत्या विद्या येत होत्या ? तो किती ज्ञानी आणि निपुण होता ?, हे दाखवून ‘तो किती श्रेष्ठ होता ?’, असे दाखवत होते. वर्ष २००६ ते २००८ या कालावधीत या मालिकेविषयी केवळ ‘दैनिक सनातन प्रभात’ मधून चौकटी आणि लेख लिहून विरोध करण्यात आला होता; मात्र अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठांनी विशेष विरोध केल्याचे आठवत नाही. काही काळानंतर वह्यांवरही ‘रावणाची चित्रे छापली जात आहेत’, असे निदर्शनास आले. यावरून ‘समाजाला धर्मशिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे ?’, हे लक्षात येते.’

– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF