राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असलेल्या धर्माभिमान्यांचा छळ करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात !

कर्नाटकमध्ये अबिद पाशा आणि त्याच्या टोळीने हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या. त्याचे अन्वेषण न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! धर्मांधांशी अशा प्रकारे उद्धटपणे बोलण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी केले असते का ? धर्मांधांच्या कार्यक्रमांत जाऊन त्याचे  चित्रीकरण करण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी दाखवले असते का ?

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळूरू आणि शिवमोग्गा येथे २७.१.२०१९ या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती मिळावी, यासाठी समितीचे श्री. चंद्र मोगेर आणि श्री. प्रभाकर नायक यांनी मंगळूरूच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली. त्या वेळी हनुमंतराय यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. श्री. नायक हे वयस्कर असतांनाही पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याशी बोलतांना हीन भाषेचा वापर केला. कार्यकर्त्यांशी ते मोठ्या आवाजात, ‘हिंदु राष्ट्राची मागणी करणे, ही घटनाबाह्य कृती आहे. उद्या मुसलमानही ‘हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र करणार’, असे सांगू शकतात. तुम्ही सर्वांना फोडण्याचे काम करत आहात. मी तुम्हाला कायद्याचा सल्ला देत आहे. तुम्हाला बुद्धी नाही. तुम्ही दिसायला साधे दिसता; मात्र तुमचे खरे स्वरूप आता उघड होत आहे.’’ हे सांगतांना ते मोठ्या आवाजात बोलत होते. या वेळी त्यांनी श्री. प्रभाकर नायक यांची माहिती विचारून घेतली. त्या वेळी श्री. मोगेर यांनी या माहितीची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर ‘मला सर्व अधिकार आहेत’, असे उद्दामपणे सांगितले. श्री. चंद्र मोगेर यांचाही पत्ता विचारल्यावर ‘मी दौर्‍यावर असल्यामुळे फिरत असतो’, असे सांगितल्यावर ‘आज रात्री कुठे रहाणार आहात, ते सांगा’, असा उद्दामपणे प्रश्‍न विचारला. ‘तुम्ही पत्ता दिला नाही, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. हा गुन्हा आहे. २४ घंट्यांत तुम्हाला अटक करू’, असे सांगितले. शिवमोग्गा येथे मैदानात सभा घेण्यासाठी पोलिसांनी अनुमती नाकारली असून सभागृहात सभा घेण्यास समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ही सभा कोणत्या सभागृहात घ्यायची, हेही त्यांनी सांगितले आहे; मात्र ‘सभेच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन लावता येणार नाही’, अशी सूचना दिली आहे. ‘या सभेचे चित्रीकरण करणार’, असेही त्यांनी सांगितले. मंगळूरू येथील सभाही सभागृहात घेण्यात येणार आहे.’


Multi Language |Offline reading | PDF